सेना-भाजप बंडखोरांना काॅग्रेसमध्ये संधी नाही..! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छुक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे.

मुंबई : काॅग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहिर करताना शिवसेना -भाजपमधील ईच्छूक बंडखोरांना बगल देत पक्षातील नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार व माजी आमदारांना पुन्हा उमेदवारी देताना बहुतांश मतदारसंघात पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.

पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून, इतर 50 जागांवर काॅग्रेसने एकाही इतर पक्षातील उमेदवाराला संधी दिली नाही. 

दरम्यान, भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर दोन्ही पक्षातील अनेक बंडखोरांनी काॅग्रेसच्या उमेदवारीसाठी संपर्क साधला होता. मात्र काॅग्रेसने त्यांना डावलून पक्षातील नव्या निष्ठावंत चेहर्यांना संधी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP rebels have no chance in Congress party