Vidhan Sabha 2019 : भाजपची शेवटची यादी जाहीर; खडसे, तावडेंना डावलले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

मुक्तईनगर या खडसेंच्या बालेकिल्ल्यात त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बोरिवलीमधून तावडेंच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई : भाजपची चौथी म्हणजेच शेवटची यादी आज (ता. 4) जाहीर झाली. सर्वांचे लक्ष एकनाथ खडसे, विनोद तावडे व बावनकुळे यांना उमेदवारी मिळते याकडे होते. पण शेवटच्या यादीतही त्यांची नावे नसल्याने या तीन मोठ्या नेत्यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खडसे, तावडे यांना उमेदवारी मिळणार की नाही यावर चर्चांना उधाण आलेले असतानाच भाजपने हा निर्णय दिलेला आहे.

Vidhan Sabha 2019 : भाजपचे नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात

मुक्तईनगर या खडसेंच्या बालेकिल्ल्यात त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बोरिवलीमधून तावडेंच्याऐवजी सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

तावडेंवर दिल्ली नाराज
तावडे यांच्यावर दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून नाराज होती, अशी चर्चा सुरु आहे. गेल्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या गाडीत बसण्याचा त्यांचा आग्रह चित्रफितीतून बाहेर आला होता. मात्र, त्यांनी सरकार नसतानाच्या काळात केलेले काम बघता त्यांना संधी मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी संयुक्त प्रयत्न केले होते. 

एकनाथ खडसे यांनी थांबावे असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली होती. 

Vidhan Sabha 2019 : रणधुमाळीला सुरवात

भाजपची चौथी यादी
1. मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
2. काटोल- चरणसिंह ठाकूर
3. तुमसर- प्रदीप पाडोळे
4. पूर्व नाशिक- अॅड. राहुल ढिकाळे
5. बोरिवली- सुनील राणे
6. पूर्व घाटकोपर- पराग शहा
7. कोलाबा- राहुल नार्वेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP releases fourth list of 7 candidates for Maharashtra Vidhan Sabha elections