भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जाणार : संजय राऊत

‘हमाम मे सब नंगे होते है, हे लक्षात असू द्या, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत
संजय राऊतsakal

मुंबई : शिवसेना आणि ठाकरे परिवारावर मागील काही दिवसांपासून चिखलफेक होत आहे. त्याला आम्ही उत्तर देऊच. पण भाजपचे साडेतीन लोक तुरुंगामध्ये जाणार. ‘हमाम मे सब नंगे होते है, हे लक्षात असू द्या, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला. उद्या (ता.१६) सेनाभवन येथे शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

राऊत म्हणाले की, उद्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत शिवसेना आणि ठाकरे परिवारावर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा तुरुंगामध्ये जाईल, तो तुरुंगामध्ये जाईल, असे ते सांगत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील, असेही वारंवार सांगितले जात आहे. पण भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील.

संजय राऊत
भाजपा शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांचा पदाचा राजीनामा

महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार आहे, हे लक्षात घ्यावे. सरकार हे सरकार असते. त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे. राजकारणातील मर्यादा तुम्ही ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे ते. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. सरकारला जे उखडायचे ते उखडा.

- संजय राऊत, खासदार, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com