भाजपमध्ये आता जागा 'फुल्ल'; भरती नाही : मुख्यमंत्री

टीम ई-सकाळ
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

- युती सरकारने विविध योजना आणल्या. मात्र, पूर्वीच्या सरकारने काय केले?

- आमच्या सरकारने ग्रामीण भागात 30 हजार किमीचे रस्ते बांधले.

मोझरी (अमरावती) : युती सरकारने विविध योजना आणल्या. मात्र, पूर्वीच्या सरकारने काय केले? आमच्या सरकारने ग्रामीण भागात 30 हजार किमीचे रस्ते बांधले. हा एक प्रकारचा इतिहासच आहे. पाच वर्षांत असे कोणत्याही राज्य सरकारने केले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) केले. तसेच भाजपमध्ये आता जागा फुल्ल झाल्याने भरती नाही, असेही ते म्हणाले.

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत. ते म्हणाले, आमच्या सरकारने शिक्षणातही सुधारणा केली. शिक्षणात यापूर्वी महाराष्ट्राचा क्रमांक 17 वा होता. आता तीन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. येत्या काळात पहिल्या क्रमांकावर येईल, याचा विश्वास आहे. तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. गेल्या सरकारपेक्षा आम्ही दुप्पट तिप्पट काम केले. पंचवीस टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात निर्माण केला. जनता मालक आहे तर आम्ही सेवक आहोत. 

तसेच ते पुढे म्हणाले, आमच्या सरकारने आदिवासी मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. काही मुलांना स्वयंरोजगार योजनेतून त्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली. राज्य सरकारच्या माध्यमातून दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In BJP seats are now Full No recruitment in Party says CM Devendra Fadnavis