'भाजपने परमबीर सिंह यांना विदेशात पाठवले', पटोलेंचा गंभीर आरोप

परमबीर सिंह
परमबीर सिंह e sakal

मुंबई : 'मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) सध्या गायब असून ते विदेशात गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यांचं शेवटचं लोकेशन हे अहमदाबादमध्ये दिसत आहे. त्यामुळे भाजपनेच परमबीर सिंह यांना विदेशात पाठविले', असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

परमबीर सिंह
खासदार गवळींना वर्षा बंगल्यावर नो एंट्री? गेटवरूनच परतल्या माघारी

'केंद्रात भाजपची सत्ता आहे तेव्हापासून आयपीएस आणि आएएस अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केला जातो. परमबीर सिंह दोषी असल्याचं अनेकदा आढळून आलं आहे. तसा खुलासा देखील तपास यंत्रणांनी केला होता. मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून सीसीटीव्ही फुटेज गायब झाले होते. त्यात देखील परमबीर सिंह यांचा हात असल्याचे समोर आले होते. याबाबत राज्य सरकार चौकशी पुढे नेण्याचा विचार करत असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांनी सूत्र स्वतःच्या हातात घेतली. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्राने या अधिकाऱ्याचा वापर केला. त्यांचे छुपे षडयंत्र समोर येऊ नये म्हणून भाजपने परमबीर सिंह यांना विदेशात पाठविले. एकदा परमबीर सिंह यांना ताब्यात घेतले, तर सर्वच प्रश्न मिटतील', असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने (NIA) मुंबईचे परमबीर सिंह यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले. तसेच चांदिवाल आयोगानेही जबाब नोंदवण्यास हजर राहण्यास समन्स बजावला होता. मात्र, परमबीर सिंह यांनी एकदाही हजेरी लावली नाही. त्यामुळेच अटकेच्या भीतीने परमबीर सिंह यांनी देश सोडल्याचा संशय एनआयए आणि महाराष्ट्र राज्य तपास यंत्रणांना संशय आहे. वारंवार समन्स बजावल्यानंतरही परमबीर सिंह यांनी हजेरी लावली नव्हती. ते घरीही नव्हते. त्यानंतर परमबीर सिंह यांचा तपास यंत्रणेनं शोध सुरु केला. एनआयएची टीम छत्तीसगड, रौहतकसह काही ठिकाणी गेली पण सिंह कुठेही सापडले नाही. त्यामुळे परमबिरचा शोध घेण्यासाठी एनआयएच पथक कामाला लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com