महामंडळ वाटपात भाजप-शिवसेनेचा समझोता

महामंडळ वाटपात भाजप-शिवसेनेचा समझोता

मुंबई - भाजप व शिवसेनेत अखेर सत्तेचा समझोता झाला असून, राज्यातील विविध महांडळांवरील नियुक्‍त्या आज राज्य सरकारने जाहीर केल्या. बहुप्रतीक्षित दहा विकास महामंडळे, सहा मंडळे व दोन प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार व माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचीही कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

नव्याने घोषित केलेल्या नियुक्‍त्या पुढीलप्रमाणे ः 1) हाजी अराफात शेख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग. 2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग. 3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील, सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ. 4) हाजी एस. हैदर आझम, अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. 5) सदाशिव दादासाहेब खाडे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, 6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, 7) संजय ऊर्फ संजोय मारुतीराव पवार, उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. 8) आशिष जयस्वाल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, 9) प्रकाश नकुल पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ.  10) नितीन संपतराव बानगुडे-पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ. 11) जगदीश भगवान धोडी, उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ. 12) उदय सामंत, अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण. 13) श्रीमती ज्योती दीपक ठाकरे, अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ. 14) विनोद घोसाळकर, सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ. 15) विजय नाहटा, सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ. 16) रघुनाथ बबनराव कुचिक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ. 17) मधू चव्हाण, अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ. 18) संदीप जोशी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळ. 19) प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ. 20) मो. तारिक कुरेशी, अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ. 21) राजा ऊर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com