विधानसभेत 220 जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांना विश्वास

विधानसभेत 220 जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला राज्यात 48 पैकी 41 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप 220 जागांवर जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या धोरणांचा फायदा जनतेपर्यंत पोहोचला असून, आम्हाला मिळालेल्या मोठ्या विजयातून हे आता सिद्ध होत आहे, असेही ते म्हणाले. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही नवा विक्रम करू असा आम्हाला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीत युतीला 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र न लढता दोन्हीही पक्ष वेगळे लढले होते. तरीदेखील त्यावेळी भाजपला 122 तर शिवसेनेला 63 जागांवर यश मिळाले होते. 

दरम्यान, चंद्रपुरात हंसराज अहिर यांचा पराभव झाला. त्यांच्या या पराभवाने आम्हाला धक्का बसला, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com