Vidhan Sabha 2019 : 'महाराष्ट्रावरील भ्रष्टाचाराचा डाग भाजपने पुसला'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत विकास करून भ्रष्टाचाराचा डाग पुसून टाकला. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथवर लक्ष देऊन विजयात योगदान द्यावे, असे आवाहन करीत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी (ता. २३) विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला.

विधानसभा 2019
पुणे-  राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर सर्वच क्षेत्रांत विकास करून भ्रष्टाचाराचा डाग पुसून टाकला. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी बूथवर लक्ष देऊन विजयात योगदान द्यावे, असे आवाहन करीत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी (ता. २३) विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला.

पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचा ‘विजय संकल्प मेळावा’ स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केला होता, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश, खासदार गिरीश बापट, अमर साबळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, दिलीप कांबळे, संजय ऊर्फ बाळा भेगडे, शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, हर्षवर्धन पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

नड्डा म्हणाले की, आर्थिक मंदीच्या काळातही एक लाख ४५ हजार कोटी रुपयांची सवलत जाहीर करण्याची हिंमत नरेंद्र मोदी सरकारने दाखवली. याचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मिळणार आहे. जम्मू-कश्‍मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द झाल्याने स्थानिकांसह संपूर्ण भारतातील लोक खूष आहेत. केंद्रात पुन्हा सत्तेवर येताच १०० दिवसांत तीन तलाक, शेतकरी व व्यापाऱ्यांना पेन्शन, महिला सशक्तीकरणाच्या योजना राबविल्या. नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगात भारताची आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे देशात महाराष्ट्राची चांगली प्रतिमा तयार झाल्याचे मतदारांना सांगा.’’

‘‘पश्‍चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. पुढील २८ दिवसांत कार्यकर्त्यांनी बूथवर जाऊन मतदारांशी संपर्क साधावा. सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोचवाव्यात,’’ असे आवाहन व्ही. सतीश यांनी  केले.

‘नाराजांकडे दुर्लक्ष नको’
जो गट पक्षावर नाराज आहे, त्यांच्याशी चर्चा करा, दुर्लक्ष करू नका. पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील बूथस्तरावरील कामाचे रिपोर्ट समाधानकारक नाहीत. पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी मतदार याद्यांवर लक्ष देऊन काम केले; तरच ही स्थिती सुधारू शकते. गाफील राहू नका, अशा कानपिचक्‍या भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिल्या.

नड्डा यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दुपारी घेतली. ‘‘पश्‍चिम महाराष्ट्रात आपल्याला जास्त कष्ट करण्याची गरज आहे. बूथस्तरावरील कामात सुधारणा होणे आवश्‍यक आहे. कार्यकर्त्यांना नुसते आदेश देऊन जमणार नाही. प्रत्येक आमदार, खासदारानेही किमान पाच मतदार याद्यांवर काम केले पाहिजे,’’ अशा सूचना नड्डा यांनी  दिल्या. ‘‘ नाराज आहेत, त्यांची यादी तयार करा. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. त्यांची नाराजी दूर कोण करू शकतो ते पाहा. यामुळे निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होऊ शकते,’’ असे नड्डा यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेती, सहकारावर लक्ष देणे गरजेचे
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका नेत्याने स्वतःची भूमिका बैठकीत मांडली. भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष आहे, असा प्रचार काँग्रेसकडून आक्रमकपणे पश्‍चिम महाराष्ट्रात केला जातो. त्यामुळे आपल्या पक्षाने शेती, सहकार, सिंचन यावर भर दिला पाहिजे. अजून अनेक जण भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Start campaigning for assembly