चंद्रकांत पाटलांनी पत्रकारालाच दिली मंत्रिपदाची ऑफर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सरकार आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारले असता त्यांनी सारवासारव केल्याचे दिसून आले. नियोजन करण्यात सरकार आणि प्रशासन कमी पडले असे वाटत नाही का?, असा सवाल ऋषी देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना केला होता.

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीतील पुरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारवर टीका होत असताना मदतीसंदर्भात एका प्रश्नावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारालाच मंत्रिपदाची ऑफर दिली.

टीव्ही 9 या वृत्तवाहिनीचे पत्रकार ऋषी देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांना मदतकार्यावरून प्रश्न विचारला असता त्यांनी थेट सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली. मी आज तुम्हाला महाराष्ट्राचा मंत्री करतो. तुम्ही मंत्रीमंडळात येऊन उद्या किती पाऊस पडू शकतो हे सांगा?, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

सरकार आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारले असता त्यांनी सारवासारव केल्याचे दिसून आले. नियोजन करण्यात सरकार आणि प्रशासन कमी पडले असे वाटत नाही का?, असा सवाल ऋषी देसाई यांनी चंद्रकांत पाटलांना केला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state president Chandrakant Patil offer to journalist on flood situation