BJP on Jitendra Awhad : "तुमची विकृती मुस्लिम धर्मियांचा...." ; भाजपचा आव्हाडांवर जोरदार पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP criticism of Jitendra Awhad

BJP on Jitendra Awhad : "तुमची विकृती मुस्लिम धर्मियांचा...." ; भाजपचा आव्हाडांवर जोरदार पलटवार

BJP on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी विरोधकांवर टीका करत आहेत. याला जोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात वादंग निर्माण झाला. भाजप नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर म्हणून आव्हाड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शेअर केला. सोबत "औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी", असे कॅप्शन दिले आहे. यावर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. (BJP criticism of Jitendra Awhad)

हेही वाचा: Video : बावनकुळेंकडून औरंगजेबचा आदरार्थी उल्लेख; नव्या वादाला फुटणार तोंड: Bavankule

"जितेंद्र आव्हाड मान्य आहे, औरंग्या तुमचा आदर्श आहे, तुमचा आयडॉल आहे. म्हणून तुम्हाला सगळीकडे औरंग्याच दिसतो आहे. आव्हाड, औरंग्याच्या प्रेमात तुम्ही एवढे आंधळे झालात की, पवित्र दर्गा देखील तुम्हाला औरंग्याची कबर वाटत आहे. तुमची ही विकृती मुस्लिम धर्मियांचा अपमान करत आहे," असे भाजपने म्हटले आहे.

औरंगजेबाबाबत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते 

“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

हेही वाचा: Sanjay Raut : योगींच्या रोडशोवर संजय राऊत यांचा आक्षेप, म्हणाले...

बावनकुळेंकडून औरंगजेबजी उल्लेख 

जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबचा उल्लेख औरंगजेबजजी असा केला. "जितेंद्र आव्हाड खोट्या प्रसिद्धीसाठी नौटंकी करतात. आव्हाड एक स्टंटबाज आणि नौटंकी माणूस आहे. त्यांच्या प्रत्येक विधानावरुन वाद निर्माण होतो आता औरंगजेबजी यांना ते क्रूर मानत नाहीत," असे बावनकुळे म्हणाले. अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता.