'उद्धवा दिलेली स्क्रिप्ट नीट पाठांतर कर'; भाजपनं पवारांसोबत शेअर केलं व्यंगचित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

'उद्धवा दिलेली स्क्रिप्ट नीट पाठांतर कर'; भाजपनं पवारांसोबत शेअर केलं व्यंगचित्र

मुंबई : शिवसेनेने आपल्या १४ मे ला मुंबईतील बीकेसी मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी केली असून सभेसाठी लोकांना आवाहन करण्यासाठी दोन टीझर रीलीज केले आहेत. दरम्यान भाजपाने एक व्यंगचित्र ट्वीट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

(BJP Viral Twit On Shivsena Sabha)

परवा (ता.१४) शिवसेनेची मुंबईतील बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. हिंदुत्वाचा खरा आवाज ऐकायला यावं लागतंय असं अवाहन करत त्यांनी दोन टीझर रीलीज केले आहेत. त्यावर टोला लावत भाजपाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन एक व्यंगचित्र ट्वीट करण्यात आलं आहे. त्यामध्ये शिवसेना ही राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या मतानुसार चालते असं प्रतिकात्मक भाजपने दाखवलंय.

हेही वाचा: मुंब्रा पोलिसांनी 6 कोटी लाटले?; तपासात NIAची एंट्री होण्याची शक्यता

भाजपाच्या ट्वीटरवरून शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमधील व्यंगचित्रात शरद पवार बसलेल दाखवले आहेत आणि त्यांच्या खुर्चीजवळ उद्धव ठाकरे वाकून उभे आहेत. आणि शरद पवार म्हणतायेत की, "उध्दवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर." आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी होय म्हणत उत्तर दिलं आहे. असं ट्वीट भाजपाने केलं आहे.

हेही वाचा: अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते, मुस्लिमही आधी हिंदू होते: रामदास आठवले

दरम्यान राज ठाकरे यांच्या झालेल्या तीन सभेनंतर महाराष्ट्रात सध्या भोंग्यावरून राजकारण पेटलं आहे. मनसेने मशिदीवरून भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर ते आता आयोध्या दौरा करणार आहेत. ५ जूनला ते आयोध्येला जाणार आहेत. तर १४ मे ला शिवसेनेची सभा झाल्यावर आदित्य ठाकरे हे १० जून रोजी आयोध्येचा दौरा करणार आहेत.

Web Title: Bjp Viral Twit On Shivsena Sabha Sharad Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top