
मुंब्रा पोलिसांनी 6 कोटी लाटले?; तपासात NIAची एंट्री होण्याची शक्यता
मुंबई : मुंब्रा पोलिसांनी खेळणी व्यापाऱ्याचे ६ कोटी लाटल्याचा आरोप केल्यानंतर आता या प्रकरणात एनआयएची एंट्री होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात एनआयएने त्यांच्या पातळीवर माहिती घेण्याचे काम सुरू केलं आहे.
मुंबईतील एका व्यापाऱ्याकडे तीस कोटी रुपये सापडले होते. त्यापैकी ६ कोटी रुपये मुंब्रा पोलिसांनी लाटल्याचा आरोप व्यापाऱ्यानी केला आहे. दरम्यान या व्यापाऱ्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा तपास पोलिसांना करायचा आहे. हे पैसे दाऊद गॅंगचे असून याचा थेट संबंध दहशतवाद्याशी आहे असा संशय एनआयएला आहे. त्यामुळे एनआयएच्या सूत्रांनी हालचाली सुरू केलेल्या आहेत असं सांगितलं जातंय. यासंदर्भात माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आला एनआयएने सुरू केलेली आहे. पण अजूनपर्यंत या केसची सूत्रे एएनआयकडे गेले नाहीत.
हेही वाचा: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मुंबईत १२ नॉन-एसी लोकल होणार एसी
याप्रकरणी कोणत्याही क्षणी एनआयए या केसचा तपास आपल्याकडे घेऊ शकते. ज्या व्यक्तीने गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते, ते कशासाठी लिहिले याचा तपास एनआयए करू शकतात. हे पत्र कसं व्हायरल झालं? हे पैसे कुणाकडे होते? यासंदर्भात सर्व सीसीटीव्ही तपासले जाऊ शकतात असा अंदाज सध्याच्या NIA च्या हालचालीवरून दिसत आहे.
हेही वाचा: किरीट सोमय्या पुन्हा राणांच्या भेटीला, दिल्लीत रंगली खलबतं
दरम्यान ठाण्यातील मुंब्रा येथील एका व्यापाऱ्याच्य घरावर पोलिसांनी धाड टाकली होती. त्यामध्ये ३० कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. पण यानंतर त्या रक्कमेतून ६ कोटींवर पोलिसांंनीच डल्ला मारल्याचा तक्रार अर्ज ठाणे पोलिसांकडे आला होता. त्यानंतर हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अर्जावर २५ एप्रिलची तारीख आहे.
याप्रकरणी धाड टाकल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती पण त्याने फक्त दोन कोटी रुपये देण्यास कबुली दिली होती. त्यानंतर व्यापाऱ्याला पोलिसांनी फक्त २४ कोटी रुपये परत करण्यात आल्याचे सांगितलं आहे.
Web Title: Mumbra Police Businessman 6 Crore Case Nia Entry
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..