भाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढविणार नाही: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबईच्या जनतेचा कौल हा पारदर्शकता आहे. महापौरपद मिळविता येईल, पण जनतेच्या कौलाचा अनादर केला असे होईल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मुंबईत महापौरपद, उपमहापौरपदाची निवडणूक लढविणार नसल्याची स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई - मुंबईच्या जनतेचा कौल हा पारदर्शकता आहे. महापौरपद मिळविता येईल, पण जनतेच्या कौलाचा अनादर केला असे होईल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मुंबईत महापौरपद, उपमहापौरपदाची निवडणूक लढविणार नसल्याचे  स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई महानगरपालिकेची यंदाची निवडणूक भाजप-शिवसेना या दोन पक्षांत अत्यंत चुरशीची झाली. भाजपने 82 जागा मिळवून ऐतिहासिक यश प्राप्त केले. त्यानंतर महापौरपद कोणाकडे जाणार, हा राज्यभर उत्सुकतेच विषय होता.

या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांनी आज भाजपची भूमिका स्पष्ट केली. "भारतीय जनता पक्ष महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, शिक्षण, आरोग्य, बेस्ट समितीसाठी निवडणूक लढविणार नाही. मात्र मुंबईत आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही.' असे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी राज्य सरकार गौतम चटर्जी आणि शरद काळे यांची समिती स्थापन करणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: BJP will not contest Mayor election in Mumbai