भाजपच्या विजयाचे भाकीत खरे ठरले

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकांबाबत "ऍक्‍सिस-इंडिया टुडे' आणि काही वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे कौल खरे ठरले असले, तरीही भाजपला या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाल्याचे दिसून येते. मुंबईमध्ये भाजपला 80 ते 81 जागा मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते, तर शिवसेनेला 86 ते 92 जागा देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात भाजपने 81 जागा जिंकत शिवसेनेच्या शतकी वाटचालीस लगाम घातला. यामुळे शिवसेनेच्या विजयाचे घोडे 84 जागांवरच अडले. कॉंग्रेसला 30 ते 34 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. या भाकिताप्रमाणे कॉंग्रेसला केवळ 31 जागांवरच समाधान मानावे लागले
ठाण्यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने 51 जागा मिळवत विजय संपादन केला, तर पुण्यामध्ये 77 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने पुण्यनगरीत कमळ फुलले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीला पुण्यामध्ये 60 ते 66 जागा मिळतील, असा दावा करण्यात आला होता; पण येथे मात्र घड्याळाचे काटे 44 जागांवरच अडले. भाजपने याखेपेसही नागपूरवरील सत्ता अबाधिक ठेवली असून, येथे 58 जागा मिळवत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.
Web Title: BJP's prophecy proved true victory