Loksabha 2019 : सोशल मीडिया प्रमुखांचा भाजपला रामराम

bjp
bjp

मुंबई : मुंबईसह राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघातील मतदान तोंडावर असतानाच भाजपचे राज्यातील सोशल मीडिया प्रमुख आशिष मरखेड यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे भाजपला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे महाराष्ट्रातील सोशल मीडिया प्रमुख आणि माहिती प्रसारण विभागाचे काम पाहणाऱ्या आशिष यांनी घरगुती कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पण, प्रत्यक्षात पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप यामागील कारण असल्याचे बोलले जात आहे. 38 वर्षीय आशिष हे मुळचे नागपूरचे आहेत. भाजपच्या सोशल मीडिया मोहिमेत वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचा कारणावरून त्यांनी पद सोडल्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून भाजपवर वार करण्यात येत असताना आशिष यांनी हे पद सोडले आहे. आशिष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॉलोअर आहे. त्यांनी आता आपल्या प्रोफाईलमध्ये भाजपच्या आयटी आणि सोशल मीडियाचा माजी प्रमुख असा बदल केला आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com