भाजपचे लक्ष्य झेडपी आणि महापालिका 

प्रशांत बारसिंग - सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावतीसह दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 297 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जिंकल्यानंतर या निवडणुकांमध्येही शतप्रतिशत भाजप करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे. 

मुंबई - राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावतीसह दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 297 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जिंकल्यानंतर या निवडणुकांमध्येही शतप्रतिशत भाजप करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे. 

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने पहिला क्रमांक पटकावला असून, सर्वांत जास्त नुकसान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या, तरी शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचे नुकसान झाले असले, तरी राष्ट्रवादीच्या तुलनेत कॉंग्रेसने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. 

नगरपालिकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदा आणि दहा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली असून, दोन्ही कॉंग्रेस आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वेळचे संख्याबळ राखण्याचे आव्हान महाराष्ट्र नवनिर्मान सेनेसमोर आहे. या निवडणुकीसाठी येत्या 2 जानेवारीपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर पक्षाचा झेंडा उंचावत ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अनेक वर्षांपासून मुंबई, ठाण्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. गेल्या निवडणुकीतील ताकद कायम ठेवण्याचे आव्हान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर आहे. 

या निवडणुका होतील 
ः- महापालिका - मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, 
सोलापूर, नाशिक, नागपूर, अमरावती आणि अकोला 
ः- जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 297 पंचायत समित्या - 
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली, 
सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, 
उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली 

नुकत्याच झालेल्या नगर परिषद/नगरपंचायतींच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल (कंसातील आकडे गेल्या निवडणुकीतील) 
ः- भाजप 1090 (398), कॉंग्रेस - 894 (1068), राष्ट्रवादी कॉंग्रेस - 786 (1152), शिवसेना - 598(359) 
ः- नगराध्यक्ष - भाजप - 64, कॉंग्रेस - 33, राष्ट्रवादी कॉंग्रेस -21, शिवसेना - 26 

दहा महापालिकांतील सध्याचे बलाबल 
1. मुंबई - भाजप - 31, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 13, कॉंग्रेस - 52, शिवसेना - 75, मनसे - 28 
2. ठाणे - भाजप 8, राष्ट्रवादी कॉंग्रेस 34, कॉंग्रेस 18, शिवसेना 53, मनसे 7 
3. उल्हासनगर - भाजप 11, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20, कॉंग्रेस 8, शिवसेना 19, मनसे 1 
4. पुणे - भाजप 26, राष्ट्रवादी कॉंग्रेस 51, कॉंग्रेस 28, शिवसेना 15, मनसे 29 
5. पिंपरी-चिंचवड - भाजप 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 83, कॉंग्रेस 14, शिवसेना 14, मनसे 4 
6. सोलापूर - भाजप 25, राष्ट्रवादी 16, कॉंग्रेस 45, शिवसेना -8, मनसे 00 
7. नाशिक - भाजप 14, राष्ट्रवादी 20, कॉंग्रेस 15, शिवसेना 19, मनसे 40 
8. नागपूर - भाजप 62, राष्ट्रवादी 6, कॉंग्रेस 41, शिवसेना 6, मनसे 2 
9. अमरावती - भाजप 7, राष्ट्रवादी 17, कॉंग्रेस 25, शिवसेना 10, मनसे 00 
10. अकोला - भाजप 18, राष्ट्रवादी 5, कॉंग्रेस 18, शिवसेना 8, मनसे 1 

सध्याची 33 जिल्हा परिषदांतील पक्षीय जागांची संख्या 
भाजप - 281, राष्ट्रवादी -604, कॉंग्रेस - 540, शिवसेना - 272, मनसे - 23 

Web Title: BJP's target municipal & zp