रक्ताच्या नातेवाइकालाही जातीचा दाखला - दिलीप कांबळे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुंबई - कोणत्याही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे जात पडताळणीचा दाखला असेल, तर त्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना जातीचा दाखला देण्यासाठी नव्याने जातपडताळणीची गरज नाही, अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना कांबळे म्हणाले की, जातीचे दाखले मिळवताना अनेक जाचक अटींचा सामना करावा लागतो.

वडिलांना जातीचा दाखला असला तरी मुलांना परत परत जातपडताळणी करावी लागते. यामध्ये वेळ व पैसा जातो. त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

यासोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाची मर्यादा 21 हजारांवरून 40 हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असून, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानातही वाढ करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

Web Title: Blood relatives caste Certificate