पालिका "मालामाल' मालमत्ता कर भरण्यासाठी रांगा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

मुंबई - काही दिवसांपूर्वी आर्थिक मदतीसाठी अटी शिथिल करण्यासाठी सरकारकडे साकडे घालणाऱ्या राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरील बंदीच्या निर्णयामुळे "अच्छे दिन' आले आहेत. जुन्या नोटांनी कर भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने पालिकांच्या कार्यालयांमध्ये लोकांच्या रांगा लागल्या होत्या. जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी अवघ्या 8 तासात 82 कोटी रुपयांचा भरणा केल्याची माहिती नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी दिली आहे. 

केंद्र शासनाने एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद केल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत नागरिकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळावी, ही राज्याची मागणी केंद्राने मान्य केली. त्यामुळे मालमत्ताधारक नागरिकांना महानगरपालिका, नगरपालिकांनी त्यांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी जुन्या चलनाने भरता यावी यासाठी आज (11 नोव्हेंबर) मध्यरात्रीपर्यंत कार्यालये सुरु ठेवली होती. 

जुन्या चलनाने विविध करांचा भरणा स्वीकारण्यात येत असल्याने आज दिवसभर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिकांच्या कार्यालयात विविध करांचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. आज दुपारी 4.00 वाजेपर्यंत विविध करांपोटी 82 कोटी 13 लाख 59 हजार रुपयांचा भरणा केला आहे. मध्यरात्रीपर्यंत विविध करांपोटी भरण्याची रक्कम 120 कोटी पेक्षा अधिक होईल असा विश्वास सचिव श्रीमती म्हैसकर-पाटणकर यांनी व्यक्त केला आहे. 
 
जुन्या चलनाने महानगरपालिकानिहाय विविध करांच्या भरणापोटी जमा झालेली रक्कम रुपये. (दुपारी 4.00 वाजेपर्यंत) 

बृहन्मुंबई महानगरपालिका- 1 कोटी 97 लाख 
नवी मुंबई महानगरपालिका- 3 कोटी 3 लाख 
कल्याण-डोबिंवली महानगरपालिका- 5 कोटी 16 लाख 
मीरा-भाईंदर महानगरपालिका- 2 कोटी 3 लाख 
वसई- विरार महानगरपालिका- 2 कोटी 23 लाख 
उल्हासनगर महानगरपालिका- 4 कोटी 50 लाख 
भिवंडी महानगरपालिका- 1 कोटी 
पुणे महानगरपालिका- 17 कोटी 60 लाख 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 5 कोटी 25 लाख 
ठाणे महानगरपालिका- 4 कोटी 25 लाख 
सांगली-कुपवाड महानगरपालिका- 1 कोटी 70 लाख 
कोल्हापूर महानगरपालिका- 51 लाख 
अहमदनगर महानगरपालिका- 1 कोटी 35 लाख 
नाशिक महानगरपालिका- 3 कोटी 50 लाख 
धुळे महानगरपालिका- 1 कोटी 9 लाख 
जळगांव महानगरपालिका- 87 लाख 41 हजार 
मालेगांव महानगरपालिका- 75 लाख 54 हजार 
सोलापूर महानगरपालिका-1 कोटी 75 लाख 
औरंगाबाद महानगरपालिका- 1 कोटी 84 लाख 
नांदेड-वाघाळा महानगरपालिका- 1 कोटी 7 लाख 
अकोला महानगरपालिका- 55 लाख 
अमरावती महानगरपालिका- 1 कोटी 10 लाख 
नागपूर महानगरपालिका- 3 कोटी 55 लाख 
परभणी महानगरपालिका- 11 लाख 64 हजार 
लातूर महानगरपालिका- 62 लाख 
चंद्रपूर महानगरपालिका- 46 लाख 
राज्यातील सर्व नगरपालिका- 14 कोटी 28 लाख  

Web Title: BMC rich property taxes to fill the row