Rajendra Gavit: शिंदे गटाला उच्च न्यायालयाचा दणका; राजेंद्र गावितांना नोटीस, काय आहे प्रकरण?

शिंदे गटाचे नेते आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Rajendra Gavit
Rajendra Gavit
Updated on

शिंदे गटाचे नेते आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका वृद्ध दाम्पत्याची फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राजेंद्र गावित यांना नोटीस पाठवली आहे. निवडणुकीसाठी पंधरा लाख रुपये घेतले आणि परत न केल्या प्रकरणी त्यांना ही नोटीस पाठवण्यास आली आहेत. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.(Bombay HC notice to MP Rajendra Gavit on plea by elderly couple who gave him loan)

रोहिंटन (वय ७६) आणि होमाई (वय ७४) तारापोरवाला असे दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्यावर काही दिवसांपूर्वी अवैध पद्धतीने कर्जवाटप करण्याचा गुन्हा दाखल केला होता.

पोलीस प्रशासन आणि अन्य यंत्रणा सहकार्य करत नसल्याचा आरोप करत हा गुन्हा रद्द करण्यासाठी तारापोरवाला दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने आता राजेंद्र गावित यांना नोटीस धाडली आहे.

अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

नेमकं काय आहे प्रकरण?

रोहिंटन आणि होमाई तारापोरवाला हे दोघे पालघरच्या बावडा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहतात. तारापोरवाला यांचा चिकूचा व्यवसायही आहे. या दाम्पत्याची दोन्ही मुलं परदेशात वास्तव्याला आहेत.

२०१९ साली राजेंद्र गावित यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र डुबला यांच्याकरवी तारापोरवाला दाम्पत्याकडून कर्जाऊ पैसे मागितले होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांना हे पैसे हवे असल्याचे राजेंद्र गावित यांनी त्यावेळी सांगितले होते.

Rajendra Gavit
Anil Jaysinghani : "जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात ते..."मोहित कंबोजचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

हे पैसे मी लगेचच परत करेन, असे राजेंद्र गावित यांनी तारापोरवाला दाम्पत्याला सांगितले होते. त्यानंतर डुबला यांच्या माध्यमातून राजेंद्र गावित यांनी तारापोरवाला यांच्याकडून १५ लाख रुपये उसने घेतले होते.

त्यावेळी राजेंद्र गावित यांनी तारापोरवाला दाम्पत्याला पोस्ट डेटेड चेकही देऊ केला होता. परंतु, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर राजेंद्र गावित हे तारापोरवाला दाम्पत्याला टाळू लागले.

ऑक्टोबर २०१९ मध्ये राजेंद्र गावित यांनी दिलेला चेकही बाऊन्स झाला, असे तारापोरवाला दाम्पत्याच्या याचिकेत म्हटले आहे.

Rajendra Gavit
Amruta Fadnavis Blackmail Case : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

तारापोरवाला दाम्पत्याने जून २०२१ मध्ये पुन्हा वणगाव पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.पण ऑगस्टमध्ये हा नागरी वाद असल्याचे सांगून गावितांविरोधाील फौजदारी गुन्हा रद्द करण्यात आला.

त्यानंतर तारापोरवाला दाम्पत्याने डहाणूच्या पोलीस अधीक्षकांनाही पत्राद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पण अवैध पद्धतीने कर्जवाटप केल्या प्रकरणी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला.

Rajendra Gavit
Maharashtra Budget Session: त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; भर विधानसभेत अजित पवार भडकले

सप्टेंबर २०२१ मध्ये तारापोरवाला यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू, सोने आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली. जयेंद्र डुबला यांनीच तारापोरवाला दाम्पत्याविरोधात व्याजाने कर्ज दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com