

Bombay High Court Grants Bail in Wife Suicide Case
पती-पत्नीमध्ये होणाऱ्या वादादरम्यान रागाच्या भरात बोललेले एखादे वाक्य म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पतीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा