Maharashtra Politics: मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. रविंद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने निर्णय दिला.