
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दररोज सरासरी २९० नव्या वाहनांची (दरमहा ८७०० वाहने) विक्री होत आहे. यामध्ये दररोज सरासरी २४ कार, २०० दुचाकीसह इतर वाहने असल्याची माहिती सोलापूर व अकलूज आरटीओकडील नोंदीवरून समोर आली आहे. १ जानेवारी ते ४ ऑक्टोबर या काळात ७० हजार नवी वाहने रस्त्यांवर आली आहेत. त्यात दुचाकी, चारचाकी व कृषी ट्रॅक्टर्सची संख्या मोठी आहे.
सोलापूर शहरासह सोलापूर-पुणे महामार्गावरील केगाव-शिवाजीनगर परिसरात चारचाकी, ट्रक्टर्सचे सर्वाधिक शोरूम आहेत. अक्कलकोट रोड, जुळे सोलापुरात दुचाकीचे शोरूम आहेत. याशिवाय बहुतेक तालुक्यांमध्ये देखील चारचाकी-दुचाकींचे शोरूम आहेत. कोणत्याही कंपनीचा कोणत्याही मॉडेलची चारचाकी,, दुचाकी घेण्यासाठी आता मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही. इतकी शोरूम सोलापुरात आहेत. २०-२५ वर्षांपूर्वी एखाद्या गावात एकमेव चारचाकी, बोटावर मोजण्याइतक्याच दुचाकी दिसायच्या. पण, आता घरातील प्रत्येक सदस्यांकडे दुचाकी, एका घरात किमान एक-दोन चारचाकी आहेत, असे चित्र आहे.
२०२५ च्या वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या काळात दरमहा सरासरी ५५०० दुचाकी आणि ६२७ दुचाकींची खरेदी ग्राहकांनी केल्याचे दोन्ही आरटीओ कार्यालयाकडील नोंदीवरून समोर आले आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात नवे वर्ष, गुढीपाडवा, दिवाळी-दसरा, धनत्रयोदशी अशा शुभमुहूर्तावर वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.
सोलापूर ‘आरटीओ’कडील नोंद
महिना कार दुचाकी ट्रॅक्टर एकूण वाहन खरेदी
जानेवारी ९३९ ४२३० ४५२ ६,२७९
फेब्रुवारी ४६८ ३,९०४ ३०१ ५,२५१
मार्च ८९५ ४,३३७ ३१२ ६,०७८
एप्रिल ५७७ ६,२५६ ४०५ ७,७७४
मे ५१६ ४,२४४ ३६५ ५,५५५
जून ५३९ ३,७९१ ३१५ ५,०७२
जुलै ५९६ ३,८११ ४५४ ५,२९४
ऑगस्ट ६०२ ४,२८३ ३२४ ५,६५२
सप्टेंबर ५४६ ३,३९७ ३३४ ४,७३२
ऑक्टोबर १८९ १,२६३ १०३ १,७००
एकूण ५,७७७ ३९,६०६ ३,३६५ ५३,३३७
सोलापूर जिल्ह्यातील ठळक...
सोलापूर आरटीओकडील नोंदीनुसार दररोज सरासरी २१ कारगाड्यांची होते खरेदी
दररोज सरासरी १४५ नव्या दुचाकींची होतेय खरेदी
दररोज सरासरी २०० नव्या गाड्या, त्यात १२ ट्रॅक्टर्सचीही होते खरेदी
अकलूज आरटीओकडील नोंदीनुसार देखील दररोज सरासरी ९० वाहनांची खरेदी होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.