कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता जेंव्हा शिवसेनेचा खासदार भाजप आमदाराने आयोजित कार्यक्रमात लावतो थेट हजेरी

कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता जेंव्हा शिवसेनेचा खासदार भाजप आमदाराने आयोजित कार्यक्रमात लावतो थेट हजेरी

मुंबई : राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना आणि भाजपात फाटलं आणि आता दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नाही. अशात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना आणि भाजप सोडत नाही. या परिस्थितीत कल्याणचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट भाजपच्या आमदाराने आयोजित कार्यक्रमात हजेरी लावल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत बोलताना हे आधीच ठरलं नसल्याचं म्हंटलं. कार्यक्रमात हजेरी लावण्याचा बेत अचानक ठरल्याचं श्रीकांत शिंदे म्हणालेत. 

सदर कार्यक्रम हा माजी मंत्री आणि डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयोजित केला होता. नुकतंच पत्रीपुलाचं उदघाटन करण्यात आलं, या पुलाला जोडणाऱ्या नवीन जंक्शनचे नामकरण सावित्रीबाई फुले यांच्या नावावर करण्यासाठीचा हा सोहळा होता. ज्यात श्रीकांत शिंदे यांनी अचानक जहरी लावली. 

यावेळी श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला. खरंतर या कार्यक्रमाला बहुसंख्य भाजप कार्यकर्तेच उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणालेत, "सध्या महामारीच्या काळात सोशल डिस्टंसिंगची गरज असली तरी नेते आणि जनतेच्या मनामध्ये कोणतंही अंतर असतात काम नये", असं  श्रीकांत शिंदे म्हणालेत.  काल हा कार्यक्रम घेण्यात आला होता. 

शिकांत शिंदे हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. येत्या काळात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका देखील येऊ घातल्यात. काही दिवसातच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या जाऊ शकतात.

mumbai political news mp of shivsena shrikant shinde walks into BJPs event taken by ravindra chawan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com