
अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचं लग्न ठरल्याने प्रियकराने धक्कादायक कृत्य केले आहे. यानंतर खळबळ उडाली आहे. प्रेयसीचे लग्न जुळल्याने दयाराम कमालीचा संतापला. त्यामुळे त्याने प्रेयसीचा वर धरमूशी महिनाभरापासून ओळख वाढविली. दारूमुळे दोघांमध्ये मैत्रीदेखील झाली. धरमू लग्नाच्या दोन दिवसांआधी २१ मे रोजी दयारामसोबत घरून निघून गेला. त्याने धरमूचा २१ मे रोजी रात्रीच कायमचा काटा काढला. दयारामच्या अटकेनंतर या खुनाचा अकल्पित उलगडा झाला आहे.