Corruption Still Deep Rooted in Maharashtra New Data Shows
Esakal
महाराष्ट्र बातम्या
राज्यात सरकारी बाबूंची खाबुगिरी वाढली, लाचखोरीत पुणे दुसऱ्या तर मुंबई शेवटच्या क्रमांकावर
Bribe Cases in Maharashtra : भ्रष्टाचाराविरोधात जनसामान्यांमध्ये वाढती जागृतीमुळे खाबुगिरी घटल्याचे दिसून येत असले तरी 'चिरीमिरी'चा भ्रष्टाचार अजूनही सुरूच आहे. राज्यात लाचखोरीत पुणे दुसऱ्या तर मुंबई शेवटच्या स्थानी आहे.
नरेश हाळणोर, नाशिक, ता. ८ : सरकारी बाबूकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम बसला असला तरी खाबुगिरी कमी झाली असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. भ्रष्टाचाराविरोधात जनसामान्यांमध्ये वाढती जागृतीमुळे खाबुगिरी घटल्याचे दिसून येत असले तरी 'चिरीमिरी'चा भ्रष्टाचार अजूनही सुरूच आहे. नाशिक विभाग भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये आघाडीवर आहे. लाचखोरीची २०२५ वर्षात राज्यात ६६९ सापळ्यांची नोंद असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९८८ लाचखोर पकडले तर, ९ प्रकरणांत अपसंपदेचे गुन्हे दाखल केले आहेत.

