तीन फूट उंचीचे वधूवर !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

मेहुणबारे (जि. जळगाव) : लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. अशीच काहीशी गाठ केवळ तीन फूट उंची असलेल्या धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील नीलेशची बांधली गेली. त्याला त्याच्याच उंचीएवढी तीन फुटांची मुलगी मिळाली. या दोघांचा विवाह आज थाटामाटात पार पडला. 

धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील लुभान बळवंत जगताप यांचा ज्येष्ठ पुत्र नीलेश याचे वय वाढले तरी उंची मात्र तीनच फूट राहिली. त्यामुळे त्याच्या लग्नाची चिंता आई-वडिलांना लागली होती. अशातच नांदगाव तालुक्‍यातील जामदरी गावात तीन फूट उंची असलेली मुलगी असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी संजय धोंडू शेवाळे यांची ज्येष्ठ कन्या योगिता हिला प्रत्यक्ष पाहिले. वधू-वराचीही पसंती झाली व मेहुणबारे येथे आज हा विवाह थाटामाटात पार पडला.

योगिताच्या कुटुंबात आई-वडील, चार बहिणी, भाऊ आहेत; तर नीलेशच्या कुटुंबात आई-वडील, दोन भाऊ, तीन बहिणी आहेत. विवास सोहळ्याला पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

वधू-वर शिक्षित 

नीलेशचे शिक्षण बारावीपर्यंत धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील शाळेत झाले. त्यानंतर त्याने शांतिदेवी चव्हाण तंत्रनिकेतन महाविद्यालयातून संगणकीय डिप्लोमा पूर्ण केला. सध्या त्याचे धामणगावात स्वतःचे दूध संकलन केंद्र आहे. त्याची अर्धांगिणी झालेल्या योगिताचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. 

Web Title: Bride Groom of three feet high