राहुल बजाज यांचे 'ते' वक्तव्य धाडसाचे; मुलानं केलं वडिलांचं कौतुक!

वृत्तसंस्था
सोमवार, 2 डिसेंबर 2019

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल बजाज यांचे वक्तव्य म्हणजे राष्ट्रहितावरील जखम असल्याचे मत व्यक्त केले.​

नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांनी केंद्र सरकारबद्द केलेले वक्तव्य हे 'अत्यंत धाडसा'चे असल्याचे मत त्यांचे पुत्र आणि 'बजाज ऍटो'चे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सोमवारी (ता.2) व्यक्त केले. मात्र वडिलांप्रमाणे असे धाडस उद्योग जगतात कोणीही दाखवत नाही. उलट सोईनुसार कडेला उभे राहून टाळ्या वाजविण्यात आनंद मानतात, अशी खंतही बजाज यांनी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एका इंग्रजी वृत्तपत्राने काल आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही त्या वेळी उपस्थित होते.

त्यांना उद्देशून राहुल बजाज म्हणाले होते की, जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार सत्तेवर होते, त्या वेळी आम्ही कोणावरही टीका करू शकत होतो. आता आम्ही भाजप सरकारवर खुली टीका केली, तर ती तुम्हाला कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.

- हैदराबाद प्रकरण : तिचं शरीर पूर्ण जळालंय का? हे पाहण्यासाठी 'ते' पुन्हा आले!

याविषयी संबंधित वृत्तपत्राला सोमवारी (ता.2) दिलेल्या मुलाखतीत राजीव बजाज म्हणाले की, सत्य कितीही कडू असले, तरी माझे वडील ते सांगण्यास भीडभाड बाळगत नाहीत. मात्र, हा संवेदनशील विषय वडिलांनी अशा प्रकारच्या व्यासपीठावर उपस्थित करायला हवा की नाही, याबाबत मनात संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले. 

- अयोध्याप्रकरणी अखेर फेरविचार याचिका; कोणाचा निर्णय?

हे उचित आहे का? 

राजीव बजाज म्हणाले, ''जसे लाल फडक्‍यामुळे बैल चिथावतो, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी (राहुल बजाज) सर्व 'दरबार' सारखेच असतात. ते अशी संधी कधीही सोडत नाहीत. मात्र, वैयक्तिक पातळीवर विचार करता, ज्या ठिकाणी उद्योजकांचा सन्मान होत आहे, अशा सार्वजनिक कार्यक्रमांत संवेदनशील विषय उपस्थित करणे उचित आहे की नाही, याबाबत मी काही सांगू शकत नाही.'' 

- आरोपींना झुंडीच्या हवाली करा; संसदेत जया बच्चन संतप्त

राष्ट्रीय हिताला बाधा : सीतारामन 

'उद्योजकांच्या मनात भीती आहे,' या राहुल बजाज यांच्या विधानानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने त्यांचे समर्थन केले आहे. 

तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल बजाज यांचे वक्तव्य म्हणजे राष्ट्रहितावरील जखम असल्याचे मत व्यक्त केले. ''आपली भूमिका मांडण्यापेक्षा उत्तरे मिळविण्याचे अनेक चांगले पर्याय आहेत. अशा गोष्टींमुळे राष्ट्रीय हिताला बाधा निर्माण होऊ शकते,'' असे सीतारामन यांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Only Cheer for Him from Sidelines says Rajiv Bajaj on father Rahul Bajaj