esakal | राज्य सरकारची उपराजधानीला पुन्हा नापसंती; हिवाळीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईतच
sakal

बोलून बातमी शोधा

budget session of Maharashtra government will be in Mumbai instead of Nagpur

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी मध्यप्रांतातील मराठी भाषिक विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला. नागपूरला असलेला तेव्हाच्या राजधानीचा दर्जा त्यागून वैदर्भीय जनता महाराष्ट्रात सामील झाली.

राज्य सरकारची उपराजधानीला पुन्हा नापसंती; हिवाळीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईतच

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : कोरोनामुळे नागपुरात अधिवेशन झालेच नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी होत होती. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तशी भावनाही व्यक्त केली होती. परंतु सरकारने नागपूर पर्यायाने विदर्भाच्या मागणीला फेटाळत अधिवेशन मुंबईलाच घेण्याचा निर्णय घेतला तशी अधिसूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढली. १ मार्चला अधिवेशन सुरू होणार आहे.

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रसंगी मध्यप्रांतातील मराठी भाषिक विदर्भ प्रदेश महाराष्ट्रात सामील झाला. नागपूरला असलेला तेव्हाच्या राजधानीचा दर्जा त्यागून वैदर्भीय जनता महाराष्ट्रात सामील झाली. २८ सप्टेंबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेल्या नागपूर करारान्वये "शासनाचे कार्यस्थान अधिकृत निश्चित कालावधीकरिता नागपूर येथे हलविण्यात येईल आणि दरवर्षी राज्य विधानमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे भरविण्यात येईल", असे सुनिश्चित करण्यात आले. 

नक्की वाचा - '...तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येईल, दक्षता बाळगा'

१९६० पासून वर्षातील ३ पैकी १ अधिवेशन उपराजधानी नागपूरमध्ये घेण्यात येते. साधारणतः हिवाळी अधिवेशन येथे होते. बोटावर मोजण्याइतक्या वेळा पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले. फडणवीस सरकारच्या काळात पावसाळी अधिवेशन घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु पावसामुळे उडालेली तारांबळ लक्षात घेता त्याचा बेत टाळण्यात आला. कोरोनामळे हिवाळी अधिवेशनही नागपूरएवजी मुंबईतच झाले. त्यावेळी सरकारवर चांगलीच टीका झाली. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची भाषा सरकारमधील मंत्री, आमदार यांच्यासह विरोधकांनीही केली होती. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अधिवेशनाबाबत अधिसूचना काढली. यानुसार १ मार्चपासून अधिवेशन मुंबईत सुरू होईल. दोन्ही सभागृहाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल.

नक्की वाचा - मी सांगतो, विरोधकांच्या काळजात धस्स झाले असेल

नागपूरला पाच वर्ष एकही अधिवेशन झाली नाही

१९६२ - भारत-चीन युद्ध
१९६३ - तत्कालीन मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे दि. २४ नोव्हेंबरला निधन
१९७९ - लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे
१९८५ - दिनांक २८ डिसेंबर ,१८८५ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबई येथे झाली होती. त्याचा शताब्दी महोत्सव मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याने या वर्षी नागपूर येथे अधिवेशन होऊ शकले नाही.
२०२० - वैश्विक महामारी कोरोनामुळे (कोविड-19) 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image