राज्यात नवे 236 पूल उभारणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 मार्च 2017

मुंबई - राज्यात रेल्वे क्रॉसिंगवरील नवे 210 पूल उभारण्यात येणार असून, राष्ट्रीय महामार्गावरील 26 नव्या पुलांचाही मार्ग मोकळा झाला आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यांच्यात याबाबतचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या या करारावर आज सह्या करण्यात आल्या. यामुळे रेल्वे क्रॉसिंग व त्यामुळे होणारे अपघात यातून नागरिकांना कायमचा दिलासा मिळणार आहे. 

या 210 रेल्वे पुलांसाठी दहा हजार कोटी रुपयांपैकी पाच हजार कोटी रेल्वे मंत्रालय तर पाच हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ते निधीतून मिळणार आहे. महाराष्ट्राला केवळ भूसंपादनाच्या पोटी येणारा 1020 कोटी रुपयांचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. 

राज्याच्या 720 किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावरून जाणाऱ्या समुद्री मार्गालाही केंद्रीय निधीतून 11 हजार कोटी रुपये देण्याचे गडकरी यांनी तत्त्वत: मान्य केले. पर्यटन व व्यावसायीक म्हणून महत्त्वाच्या या मार्गाचे रुंदीकरण व सौंदर्यीकरण करण्याबाबतचे आज सादरीकरण करण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेल्या या मार्गालाच रुंद करून देशातला सर्वांत प्रभावी असा पर्यटनाच्या दृष्टीने हा मार्ग उभारण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी विविध परवानग्या व भूसंपादनाचे जाचक नियम असल्याने त्याचा सविस्तर आराखडा तयार करून तो तातडीने सादर करण्याच्या सूचना गडकरी यांनी दिल्या. 

विकासासाठी... 

210   रेल्वे क्रॉसिंगचे पूल 

26   राष्ट्रीय महामार्गावरचे पूल 

10 हजार कोटी रुपये  येणारा खर्च 

Web Title: Build 236 new state bridge