समृद्धी महामार्गावर पुलाचा गर्डर कोसळला

सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही
buldhana the girder bridge under construction collapsed the trailer got stuck under the 200 ton girder
buldhana the girder bridge under construction collapsed the trailer got stuck under the 200 ton girdersakal

सिंदखेड राजा,(जि.बुलडाणा) : सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील पुलावर सिमेंट गर्डर टाकत असताना गर्डर क्रेनमधून निसटून खाली कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, पुलाखाली असलेल्या वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे उद्‌घाटन होण्यापूर्वीच समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागले आहे.

पिंपळखुटा गावाच्या बाजूने समृद्धी महामार्ग जातो. या महामार्गावरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. बुधवारी (ता. २७) सायंकाळी क्रेनच्या साहाय्याने पुलावर सिमेंट गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. गर्डर क्रेनने उचलला असताना गर्डर खाली कोसळला. या सिमेंट गर्डरचे वजन अंदाजे २०० टनाच्या जवळपास आहे. पुलाची लांबी ४०० मीटर असून उंची अंदाजे ९० ते १०० फूट आहे. या दुर्घटनेच्या वेळी कामगार तेथे नव्हते. पुलाखाली उभा असलेल्या ट्रेलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

क्रेनचा जॅक घसरल्याने गर्डर कोसळला

मुंबई : क्रेनच्या साह्याने गर्डर पुलावर ठेवण्याचे काम सुरू होते. गर्डर साधारणतः दहा फुटांवर असताना क्रेनला लावलेला जॅक घसरल्यामुळे गर्डर खाली कोसळला. दुर्दैवाने जॅक निखळल्यामुळे अपघात झालेला आहे. अपघातामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून काम पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com