
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. राज्याच्या वनविभागानं ही कारवाई केली असून खोक्यानं वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन घर बांधल्याचा दावा केला आहे.