सुटीच्या दिवशीही कापूस खरेदी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, राज्यातील कापूस खरेदी शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश येईपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ‘एफएक्यू’ दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली.

मुंबई - राज्यात शिल्लक कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, राज्यातील कापूस खरेदी शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश येईपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ‘एफएक्यू’ दर्जाच्या कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसेच शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यात येईल.  

गल्ली ते दिल्ली एकच चर्चा, कधी सुटणार कोरोनाच्या लसीचा जांगडगुत्ता?

चंद्रपूर व नांदेड या जिल्ह्यांच्या काही तालुक्यांत खरेदीसाठी जिनिंग फॅक्टरी उपलब्ध नसल्याने या जिल्ह्यातील कापूस खरेदी शेजारच्या तेलंगण राज्यातील फॅक्टरीमध्ये करण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

राज्यात आज सर्वाधिक 3254 कोरोना रुग्णांची नोंद; राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 94, 041 वर..

राज्यातील कापूस स्थिती 
(आकडे लाख क्विंटलमधील)

४१०   -   २०१९-२० मधील उत्पादन
१९८   -  खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी
१८८. १७  -  पणन महासंघाकडून खरेदी
३८६ .१७   -  एकूण खरेदी
२३. ८३   -  शिल्लक खरेदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buy cotton even on holidays ajit pawar