अमिताभ बच्चन यांनी रिट्‌विट करून दाखवली विठ्ठलभक्ती !

रिट्‌विट करून अमिताभ बच्चन यांनी दाखवली विठ्ठलभक्ती
Amitabh Bacchan
Amitabh BacchanCanva
Summary

बॉलिवूड चित्रपटसृष्टीचा शहेंशाह अमिताभ बच्चन अद्याप पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येऊ शकलेले नाहीत; परंतु विठू माऊलीच्या दर्शनाची आस त्यांनाही लागली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : अनेक राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्गज कलकारांना सावळ्या विठुरायाने आपल्या भक्तीची भुरळ घातली. बॉलिवूड चित्रपटसृष्टीचा शहेंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अद्याप पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येऊ शकलेले नाहीत; परंतु विठू माऊलीच्या दर्शनाची आस त्यांनाही आहे. श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीने (Shri Vitthal-Rukmini Mandie Samiti) ट्‌विटरवर पोस्ट केलेले श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचे फोटो अमिताभ यांनी रिट्‌विट करून आपण देखील विठ्ठलभक्त आहोत, हेच जणू दाखवून दिले आहे. (By retweeting, Amitabh Bachchan showed devotion to Lord Vitthal)

Amitabh Bacchan
मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेले तरुण सरपंच ऋतुराज देशमुख आहेत तरी कोण?

पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाने अनेक संतांना आपल्या भक्तीची भुरळ घातली. त्याच्या भक्तीचा महिमा अगाध आहे आणि त्यामुळेच गोरगरीब वारकरी, कष्टकरी दरवर्षी त्याच्या भेटीसाठी मैलोन्‌मैल चालत पंढरपूरला येतात. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. शंकरदयाळ शर्मा, ग्यानी झैलसिंग, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या नेतेमंडळींसह अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक, वादक असे दिग्गज कलाकार देखील पंढरपूरला येऊन त्याचे दर्शन घेऊन तृप्त झालेले आहेत.

Amitabh Bacchan
यंदाही शाळा राहणार बंदच ! दिवाळीनंतर आठवी ते बारावीचा निर्णय

मात्र विठुरायाच्या भेटीची आस मनाशी असताना देखील अनेकांना पंढरपूरला येणे जमत नाही. मग कधी कोणी त्याचा अभंग गुणगुणून तर कोणी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करून, श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीकडे देणगी पाठवून विठ्ठलभक्ती जागवत असतात. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या मनातील विठ्ठलभक्ती अशाच वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे. मंदिर समितीने ट्‌विटरवर अपलोड केलेले श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मातेचे फोटो अमिताभ बच्चन यांनी रिट्‌विट करून एक प्रकारे आपली विठ्ठलभक्तीच दाखवून दिली आहे.

श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी गेल्या काही वर्षांपासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मातेच्या पोषाखात वैविध्यता आणली आहे. विशेषतः पोषाखातील रंगसंगती मनमोहक आणि आकर्षक करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात असून, दररोज पोषाखानंतर श्री विठ्ठल- रुक्‍मिणीमातेचे फोटो ट्‌विट केले जात आहेत. फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी भाविकांना विठुरायाचे त्याद्वारे दर्शन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com