मुख्यमंत्री होणार राज्यपाल नियुक्त आमदार; सरकार करणार शिफारस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 एप्रिल 2020

घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव राज्यमंत्रीमंडळाने आज (ता. ०९) मंजूर केला. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळात यावर चर्चा झाली असून सरकार राज्यपालांना शिफारस करणार आहेत.
 

मुंबई : घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा ठराव राज्यमंत्रीमंडळाने आज (ता. ०९) मंजूर केला. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळात यावर चर्चा झाली असून सरकार राज्यपालांना शिफारस करणार आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ठाकरे हे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सध्या सदस्य नाहीत. त्यांना २६ मे पूर्वी आमदार होणे आवश्यक आहे. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुका कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे ठाकरे २६ मे पूर्वी आमदार होणार की नाही, याची शंका घेतली जात होती. 

Coronavirus : पाकिस्तानला तबलिगींचा मोठा फटका; २.५लाख लोक संपर्कात

मात्र, राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त झाल्याने त्यापैकी एका जागेवर ठाकरे यांची शिफारस करण्यात आली. एखाद्या मुख्यमंत्र्याने स्वतःच आपल्या नावाची शिफारस आमदार म्हणून केल्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. राज्यपाल आता ठाकरे यांची शिफारस स्वीकारणार का? याची उत्सुकता आहे.

Coronavirus : ट्रम्प म्हणतात तुमचे उपकार विसरणार नाही; मोदींनी दिले हे प्रत्युत्तर

दरम्यान, मोठ्या शहरात गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. भाजी खरेदीसाठी मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या गर्दीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाउन असूनही लोक शहरात अजून ही भाजी घेण्यासाठी मार्केट मध्ये जातात. प्रशासनाने वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याने याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cabinet recommends uddhav thackerays name governors nomination