esakal | राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान

राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान

sakal_logo
By
नामदेव कुंभार

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी अथवा शह देण्यासाठी भाजपकडून फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी परखड मत नोंदवत नारायण राणे यांना थेट आव्हान दिलं आहे. कोकण शिवसेनेचेच आहे. नारायण राणे यांना शपथ दिल्याने काय होईल ते बघू असं म्हणत कोकण आमचेच असल्याचा विश्‍वास शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केला आहे.

नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यामुळे कोकणवासीय शिवसेनेला अंतर देतील, असं म्हणण्यात काहीच तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. तसंच कोण कुणाला अंगावर घेतं हे तुम्हीच बघाल, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याचं सांगितलं जातं असलं तरी प्रत्यक्षात कोण कुणालं अंगावर घेतं हे तुम्ही येणाऱ्या काळात बघालच, असे आव्हान अनिल देसाई यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देसाई बोलत होते.

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेनिहाय मंत्र्यांची यादी

कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेते कधीही अंतर पडणार नाही, असा विश्वासही अनिल देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई आणि कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री, पाहा कुणाकडे कोणतं खातं?

विनायक राऊत काय म्हणाले?

ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये” असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हे क्रम प्राप्त आहे. ते करताना कोकणातील वाढत्या शिवसेनेचा प्रभाव लक्षात घेऊन कुणाची तरी वर्णी लागत असेल, तर हे शिवसेनेचं मोठेपण आहे. पण ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये. त्यांनी यापूर्वीची आणि आताची शिवसेना अनुभवलेली आहे. कोकण म्हणजे शिवसेना हे जे समीकरण आहे. ते पुसण्याचं काम करू शकत नाही.

loading image