ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका; मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

  • कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने आणखी एक मोठा घेत फडणवीसांना दणका दिला आहे. आज (ता. ०७) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील यासंदर्भातील तरतूद देखील वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात घेतलेले अनेक निर्णय या सरकारने रद्द केले आहेत. त्यात आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी, तब्बल 35 जणांचा मृत्यू; तर...

या अधिनियमानुसार 13 जून 2015 पासून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्यांसाठी तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय लक्षात घेऊन आतापर्यंत केलेल्या नियुक्त्या प्रकरणपरत्वे रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet takes Decision to cancel appointment of expert directors on Market Committees