राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे

Eknath Shinde Fadanvis
Eknath Shinde FadanvisSakal

मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातील खातेवाटेप आजअखेर झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं कायम असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखात देण्यात आलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबादारी देण्यात आली आहे. (Cabinet's allocation of portfolios announced)

Eknath Shinde Fadanvis
'ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात, माहिती व जनसंपर्क विभागासह पणन, परिवहन, सामाजिक न्याय आणि विशेष सहायता असणार आहे. तर मंत्रीमंडळ विस्तारात वित्त व नियोजन आणि गृहखातं या सारखी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडे सोपविण्यात आली आहे. राधाकृष्णविखे पाटील महसूल मंत्रालयासह त्यांच्याकडे दुग्धविकास तसेच पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. सुधीर मुनगंटीवार वन आणि सांस्कृतीक कार्य मंत्रालयाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयासह संसदीय कार्यमंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे.

Eknath Shinde Fadanvis
मेटेंची तळमळ, न्याय देण्याचा आग्रह पाहून कौतुक वाटायचं - उद्धव ठाकरे

विजय कुमार गावित यांच्याकडे आदिवासी मंत्रालयाची, गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राजसह वैद्यकीय शिक्षण विभाग देण्यात आला आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर दादा भुसे यांना बंधारे व खणीकर्म सोपविण्यात आलं आहे. तर संजय राठोड यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन देण्यात आलं. तर सुरेश खाडे यांना कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली असून उदय सावंत यांना उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे. तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला व बालविकास खात्याचा भार.

Eknath Shinde Fadanvis
Vinayak Mete: विलासराव देशमुख म्हणायचे,"मेटेंना वाऱ्याची दिशा अचूक कळते"

अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळाच्या खातेवाटपावरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र चित्र पूर्णपणे वेगळ आहे. देवेंद्र फडणवीसांकडे महत्त्वाची खाती देऊन केंद्रीय नेतृत्त्वाकडून ताकद देण्यात आली आहे.

शिंदे गटात उद्योग मंत्रालयात उदय सावंत यांना, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंबकल्याण देण्यात आलं आहे. तर अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण विभाग आणि मराठी भाषा विभाग देण्यात आला आहे. तर संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना, रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय सोपविण्यात आलं आहे. तसेच सुरेश खाडे यांच्याकडे कामगार मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान औरंगाबादचे अतुल सावे यांच्याकडे सहकार मंत्रालयासह इतर मागास कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून शंभुराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय देण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com