ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत; कॉंग्रेस खासदाराची जीभ घसरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis vs Balu Dhanorkar

गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय.

'ब्राम्हणांची पोरं खारिक-बदाम खातायत अन् बहुजनांची मुलं जांभया देतायत'

गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विविध कारणावरुन कॉंग्रेस (Congress) विरुध्द भाजप असा सामना पहायला मिळत आहे. त्यातच आता कॉंग्रेसच्या एका खासदारानं शिवराळ भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

कॉंग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांची भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. ब्राह्मण समाजावर (Brahmin Community) टीका करताना शिवराळ भाषा वापरलीय. काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेनिमित भद्रावती इथं शनिवारी झालेल्या कार्यक्रमात खासदार धानोरकर बोलत होते.

वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर (BJP Government) टीका करतांना धानोरकर यांनी त्यांचा मोर्चा राज्यातील सत्ताधाऱ्यांकडं वळवला. ते म्हणाले, राज्याच्या मंत्री मंडळात भ्रष्टाचारी, नालायक लोकांचा समावेश आहे. मंत्री भ्रष्टचारी असले तरी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सर्वांना क्लीन चीट दिलीय. त्यामुळं जन्माला यायचं असेल तर ब्राह्मणांच्याच पोटी यावं. आज ब्राम्हणांची पोर खारिक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली.