ट्रम्पना जे जमते ते मोदींना जमेल का: शिवसेना

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई : इतर देशांच्या नागरिकांऐवजी अमेरिकन नागरिकांनाच प्राधान्य देण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक करत ट्रम्प यांना जे जमते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहज जमू शकेल, अशा शब्दांत शिवसेनेने 'सामना'च्या मुखपत्रातून नरेंद्र मोदी यांना सूचना केली आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, "अमेरिकी लोकांच्या हितसंबंधांचे रक्षण करूच अशी गर्जना ट्रम्प यांनी केली आहे व जिथे अमेरिकी लोकांच्या जागी इतर देशांच्या लोकांना प्राधान्य दिले आहे त्यांना नारळ देण्याची घोषणा केली आहे. असा ठोस निर्णय पंतप्रधान मोदी पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीत घेतील काय? पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञ, टीव्हीवाले हिंदुस्थानात पैसे कमवायला येतात व येथील स्थानिक कलाकारांच्या पोटावर लाथ मारतात. जगाने मूर्ख ठरवलेल्या ट्रम्प यांना जे जमते ते हिंमतबाज व ज्ञानी म्हणून गणल्या गेलेल्या आमच्या पंतप्रधानांना सहज जमू शकेल.'

भारतात नोटाबंदीमुळे रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. "मेक इन इंडिया'तील रोजगारनिर्मिती मंदावली असून 'ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेतून भारतात बेरोजगारांचे लोंढे आदळले तर कसे व्हायचे? ट्रम्प यांच्यासारखे धोरण हिंदुस्थानातही राबवता येईल काय?' असे काही प्रश्‍नही अग्रलेखात उपस्थित करण्यात आले आहेत.

Web Title: Can Modi adopt policy of Trump: Shivsena