कॅनडातून फरारी कैदीचा गोव्यात ड्रगचा कारखाना

अनिश पाटील
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) 40 कोटींच्या ड्रगनिर्मिती प्रकरणात गोव्यातून अटक केलेला व्हिएतनामी नागरिक केन क्‍युआँग मान्ह न्गुयेन हा कॅनडातील हत्या प्रकरणातील फरारी कैदी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पॅरोल मिळाल्यानंतर पळालेल्या या आरोपीबाबत आता केंद्रीय यंत्रणा कॅनडा पोलिसांशी संपर्क साधणार आहे.

तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्गुयेन हा कॅनडातील आशियायी टोळीचा हस्तक आहे. 1999 मध्ये कॅनडातील टोळीयुद्धात त्याने प्रतिस्पर्धी टोळीतील डोन मि व्हू याची हत्या केली होती. गुरमित धक नावाच्या टोळीच्या सदस्यासोबत त्याने वॅनकॉवर येथे ही हत्या केली होती. पुढे 2010 मध्ये धकची ब्रिटिश कोलंबिया येथे प्रतिस्पर्धी टोळीने हत्या घडवून आणली. त्यामुळे तेथे टोळीयुद्ध भडकले होते. 1999 मधील हत्येप्रकरणी पुढे न्गुयेनला अटक झाली व न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर एप्रिल-मे 2015 या कालावधीत न्गुयेनने पॅरोल घेतला व तो मायदेशी व्हिएतनामला गेला. तेथून तो परतलाच नाही. त्याने पॅरोल नियमांचा भंग करून भारत गाठला.

ब्रिटनचा नागरिक असलेल्या जॉनथनसह त्याने गोव्यात केटामाईनचा कारखाना सुरू केला. या प्रकरणात अटकेत असलेल्या जिम्मीसिंग संधू याच्या काखान्यात त्यांनी "डेट रेप ड्रग' म्हणून प्रसिद्ध असलेल्या केटामाईनची निर्मिती सुरू केली. कॅनडातील या केटामाईनच्या वितरणाची जबाबदारी न्गुयेन व संधू या दोघांवर होती, असा डीआरआयला संशय आहे. रॉयल कॅनडीयन माउंटेड पोलिसांच्या वॉण्टेड यादीत न्गुयेनचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटकडून आतापर्यंत 307 किलो केटामाईन, 140 ग्रॅम कोकेन, दीड किलो ओपियम व 7.8 किलो हशिश जप्त करण्यात आले आहे.

Web Title: canada Absconding prisoner drugs factory in goa crime