‘पूरग्रस्त वीजग्राहकांचा स्थिर आकार रद्द करा’

‘पूरग्रस्त वीजग्राहकांचा स्थिर आकार रद्द करा’

मुंबई - कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांतील वीजग्राहकांचा ऑगस्टमधील स्थिर आकार रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने केली आहे. पूरग्रस्तांचे प्रचंड नुकसान लक्षात घेऊन महावितरणने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन संघटनेने केले आहे. 

पूरस्थितीमुळे महावितरणला नाईलाजाने १५ ते ३० दिवस २४ तास वीजपुरवठा खंडित करावा लागला होता. पूर ओसरल्यानंतर अद्याप काही व्यवसाय व कारखाने सुरू झालेले नाहीत. या परिस्थितीत महावितरणने पाठवलेल्या ऑगस्टच्या वीजदेयकांत स्थिर आकार किंवा किमान आकार नेहमीप्रमाणे पूर्ण महिन्याचा लावण्यात आला आहे, असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. ग्राहक वीजदेयके भरत असले तरी, पूरस्थितीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन महावितरणने वीजग्राहकांचा किमान एक महिन्याचा स्थिर आकार माफ करावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com