ZP: जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया रद्द; ग्रामविकास खात्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP: जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया रद्द; ग्रामविकास खात्याचा निर्णय

ZP: जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया रद्द; ग्रामविकास खात्याचा निर्णय

जिल्हा परिषदांमधील 13514 पदांची भरती पदांची भरती रद्द करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात आला आहे. अर्जदारांच्या तपशीलामद्धे अनेक त्रुटी असल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अठरा सवर्गांच्या गट क च्या 13 हजार 514 पदांसाठीची भरती प्रक्रिया मार्च 2019 मध्ये जाहीर करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांमुळे ही भारती प्रक्रिया पुढे जात होती. सुरवातीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचार संहिता जाहीर झाली. त्यानंतर कोरोना संकट समोर आलं त्यानंतर ACBC च्या आरक्षणाचा घोळ झाला होता. या वेगवेगळ्या कारणांमुळे ही भारती प्रक्रिया पुढे जात होती.

आताही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक तरूणांनी वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केले होते. आता ग्रामविकास खात्याने परीक्षा रद्द केल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क परत देण्याचे सांगण्यात आले आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी 2 ते 3 ठिकाणी अर्ज भरले आहेत त्या ठिकाणी त्यांना आता फी परत घेण्यासाठी फेरे मारावे लागणार आहेत.

टॅग्स :ZP