राष्ट्रवादी युवककडून जिल्हा प्रभारींच्या निवडी जाहीर

राष्ट्रवादी युवककडून जिल्हा प्रभारींच्या निवडी जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच मेहबुब शेख तर कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे आणि सूरज चव्हाण यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून जिल्हा प्रभारींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्याच्या प्रभारीपदी अनिल पतंगे, यवतमाळ जिल्हाप्रभारीपदी निखील ठाकरे तर जालना जिल्ह्याच्या प्रभारीपदी आशिष मेटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, अमरावती-संदिप काळे, वाशिम-विनय कडू, चंद्रपूर-प्रणय अजमेरा, नागपूर-ऋषीकेश वैद्य, वर्धा-गजानन रेवाडकर, गडचिरोली-अमित उमरे, भडारा गोंदिया- जगदीश पंचबुद्धे, औरंगाबाद-कुमार वाळके, परभणी-संतोष मुंढे, हिंगोली- इरफान शेख, नांदेड-अविनाश उगले, बीड-गंगाधर जवंजाळ, लातूर- किशोर देशमुख, उस्मानाबाद-गजानन कामीतकर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. 

पक्षाच्या बळकटीसाठी तसेच ध्येय धोरणे सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार या निवडी केल्या असल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com