जळगावात शासनाचं पोर्टल हॅक; बोगस लसीकरण प्रकरणी 34 जणांवर गुन्हा | Bogus Corona Vaccination | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

जळगावात शासनाचं पोर्टल हॅक; बोगस लसीकरण प्रकरणी 34 जणांवर गुन्हा

जळगाव : सध्या कोरोनाचा (Corona) कहर वाढत असताना प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे, या दरम्यान बोदवड शहरात शासकीय पोर्टल हॅक करून कोरोनाची लस घेतल्याची नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ३४ जणांनी लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचे उघडकीस आले आहे. ज्यांच्या नावाच्या या बोगस नोंदी झाल्या आहेत त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

शहरातील दत्त कॉलनी व उर्दू शाळा परिसरात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या वेळेत तब्बल दीड तासात वैद्याकिय अधिकाऱ्यांनी राबवलेल्या लसीकरणात पोर्टलवर मात्र तब्बल 34 नावे लसीकरण न करताच वाढलेली दिसून आली. त्यांनी डेटा ऑपरेटरशी चर्चाही केली; परंतु सदर लसीकरणाची नोंद करणारे पोर्टल हे अज्ञात व्यक्तीने हॅक करीत या नोंदी केल्याचे सांगण्यात आले. एनगाव आरोग्य अधिकारी कपिल पवार यांनी बोदवड पोलिसांत ३४ नागरिकांविरुद्ध तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

हेही वाचा: भीषण! गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकची धडक, 15 जण ठार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusJalgaon
loading image
go to top