ब्रेकिंग! नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात? कोर्टानं जात प्रमाणपत्र केलं रद्द

navneet rana
navneet rana

नागपूर : खासदार नवनीत राणा (MP Navnet Rana) यांचं जात प्रमाणपत्र (Caste certificate) आज कोर्टानं रद्द केलं आहे. नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. अमरावतीची जागा ही खरं तर अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव ठेवण्यात आली होती. त्यावर नवनीत राणा यांनी खासदारकीची निवडणूक लढली होती. त्यांचा विजयी ठरल्या होत्या. या विरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao adsul) यांनी याचिका दाखल केली होती. मात्र आता कोर्टानं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. (caste certificate of Navneet rana cancel by high court)

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे २०१४ साली नवनीत राणा यांच्या विरोधात निवडून आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यावेळी नवनीत राणा यांनी जात प्रामाणपत्र देऊ करून निवडणूक लढली होती. मात्र आता या विरोधात २०१७ साली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. हा संविधानिक घोटाळा असल्याचं कोर्टानं म्हंटल आहे. त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय.

गुन्हा दाखल करणार

खोटं जात प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्याबाबत आता मी नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. तसंच आता त्यांची खासदारकी जाणार आहे असं आनंदराव अडसूळ यांनी म्हंटलंय.

खासदारकी धोक्यात

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. तसंच त्यांना २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच मात्र नवनीत राणा नवनीत राणा यांनी त्यांच्या आजोबांपासून सगळ्यांचं खोटं जात प्रमाणपत्र तयार केलं असा आरोप करण्यात येत आहे,. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक लागणार की थेट आनंदराव अडसूळ यांना खासदारकी मिळणार हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

राणा सुप्रीम कोर्टात जाणार?

आता या प्रकरणात नवनीत राणा यांच्यासमोर सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आता नवनीत राणा सुप्रीम कोर्टात जाणार का हे बघणं महत्वाचं असेल.

(caste certificate of Navneet rana cancel by high court)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com