जात पडताळणीसाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आता 30 जूनऐवजी 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आता 30 जूनऐवजी 10 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अनेकांना ही प्रमाणपत्रे मिळू न शकल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्‍यता होती. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी हा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2018-19 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले होते. हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी "अंडरटेकिंग' घेण्यावर स्थगिती आहे. त्यामुळे पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागास देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुदतवाढीमुळे विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. मात्र, ही सवलत यंदाच्या वर्षासाठीच लागू राहील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: caste cheaking period increase