मुंबई लोकलमध्ये तरुणाचा स्कर्ट घालून कॅटवॉक, Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

मुंबई लोकलमध्ये तरुणाचा स्कर्ट घालून कॅटवॉक, Video Viral

सोशल मीडियावर मुंबई लोकलदरम्यानचे अनेक व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा मुंबई स्टेशनवरील गरबा दांडिया खेळतानाचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. अशातच एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक तरुण स्कर्ट परिधान करुन कॅटवॉक करताना दिसत आहे.(Catwalk wearing shivam bhardwaj skirt in Mumbai local Video Viral )

'द गाय इन अ स्कर्ट' म्हणून प्रसिद्ध असलेला, शिवम एक फॅशन ब्लॉगर आहे आणि अप्रतिम मेकअप व्हिडिओ शेअर करतो. असाच एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. यात शिवम स्कर्ट घालून लोकल ट्रेन कॅटवॉक करताना दिसत आहे.

एका युजरने शिवमला चॅलेंज दिले होते. शिवमच्या पोस्टवर 'सार्वजनिक ठिकाणी स्कर्ट परिधान केल्यामुळे पुरुष त्याच्याकडे कधीही प्रभावित होणार नाहीत. ' अशी कमेंट केली होती. हेच आव्हान स्विकारत शिवम लोकल ट्रेनमध्ये स्कर्ट घालून पोहोचला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलेला शिवम कॅटवॉक करताना दिसत आहे.

कोण आहे शिवम

शिवम भारद्वाज असं त्याचं नाव आहे. मुंबईत पाय रोवण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला. मात्र, नंतर शिवमची मेहनत पाहून वडिलांनी स्वत: कॅमेरा विकत घेण्यासाठी पैसे दिले व शिवमने सिटी ऑफ ड्रीम्समध्ये आपला ठसा उमटवला.