दाभोलकर हत्येप्रकणी पुनाळेकर, भावेंना अटक

dabholkar-murder
dabholkar-murder

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हिंदू विधिज्ञ परिषदेचे वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी दाभोळकर हत्येप्रकरणी शरद कळसकर याला अटक करण्यात आली होती, त्याने दिलेल्या जबाबानुसार सीबीआयने पुनाळेकर व भावे यांना अटक केली आहे.

एटीएसने ऑगस्ट 2018 मध्ये नालासोपाऱ्यातून वैभव राऊतच्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्या प्रकरणात शरद कळसकरलाही अटक केली होती. एटीएसने केलेल्या चौकशीत त्याने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभागाची कबुली दिली होती. नंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतरच औरंगाबादमधून सचिन अंदूरेला पोलिसांनी अटक केली होतीव आता पुनाळेकर व भावे यांना अटक करण्यात आली आहे.

अॅड. पुनाळेकर यांनी दाभोलकर आणि अॅड गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची बाजू अनेकदा मांडली आहे. दाभोलकर कुटुंबियांनी पुनाळेकर यांच्यावर यापूर्वी सातत्याने आक्षेप घेतले होते. त्यांच्या अटकेची मागणीही दाभोलकर कुटुंबियांनी केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com