केंद्राने बदलला निकष : राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही सन्मान निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pm kisaan sanman yojana

केंद्राने बदलला निकष : राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही सन्मान निधी

सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला प्रत्येक चार महिन्याला दोन हजारांप्रमाणे वर्षात सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेत महाराष्ट्रातील एक कोटी नऊ लाख 33 हजार 298 शेतकरी खातेदार लाभार्थी आहेत. पण, केंद्र सरकारच्या नव्या निकषांनुसार आता आधार प्रमाणिकरण न झालेल्या आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी संलग्न नाही, त्यांना लाभ मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे राज्यतील 21 लाख शेतकऱ्यांना आता काही दिवसांत आधार क्रमांक बॅंक खात्याला लिंक करावा लागणार आहे.

हेही वाचा: ''तुरुंगात जाण्यासाठी परबांनी लवकर बॅग भरावी''

राज्यातील शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एक कोटी सहा लाख 53 हजार 329 खातेदारांची आधारकार्ड क्रमांकानुसार माहिती प्रमाणित करण्यात आली आहे. पण, अद्यापही पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी स्वत:चा आधार क्रमांकच दिलेला नाही. काहींच्या आधार क्रमांकात त्रुटी असल्याने ते प्रमाणित होऊ शकले नाहीत. दरम्यान, या योजनेअंतर्गत मार्च 2022 अखेर दोन हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत दहा हप्ते लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. आता एप्रिल ते जुलै 2022 या कालावधीतील लाभाची रक्कम आणि त्या पुढील लाभाची प्रत्येक रक्कम ही लाभार्थ्याच्या आधार लिंक बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील एक कोटी सहा लाख 53 हजार 329 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीत झाले आहे. त्यापैकी 17 लाख 78 हजार 283 लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बॅंक खात्याशी लिंक नाही. दुसरीकडे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण जरी झाले, तरीही त्यांचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक असायला हवा, असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ संबंधित बॅंकेत जाऊन बॅंक खाते आधार संलग्न करायला हवे. अन्यथा एप्रिलअखेर मिळणारा दोन हजार रुपयांचा 11 वा हप्ता जवळपास 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: गुळाला हवी आता महाराष्ट्राची साथ! उत्पादन, प्रक्रिया व विक्रीच्या प्रचंड संधी

ज्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत नोंदणी करताना आधार क्रमांक दिला नाही किंवा आधार क्रमांकात त्रुटी राहिली. त्यांनी तत्काळ संबंधित तहसील कार्यालयात जाऊन त्रुटी दूर करून घ्यावी. आधार क्रमांक आपल्या बॅंक खात्याशी संलग्न करून घ्यावा, अन्यथा पुढील लाभ मिळणार नाही.
- विनयकुमार आवटे, उपायुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे

हेही वाचा: कॅबिनेटमध्ये दिलीप वळसे-पाटलांविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची नाराजी!

सन्मान योजनेची सद्यस्थिती
एकूण लाभार्थी
1,09,33,298
लाभ मिळणारे शेतकरी
1,06,53,329
आधार लिंक नसलेले शेतकरी
17,78,283
आधार प्रमाणिकरण नसलेले
2.78 लाख

Web Title: Center Changes Criteria 21 Lakh Farmers In The State Will Not Get Pradhanmantri Kissan Sanman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top