nana patole
nana patolesakal media

मंत्र्यांवरील छाप्यांमागे फडणवीसांचा हात; नाना पटोले यांचा आरोप

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा हेतू

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर केंद्रीय तपास संस्थांचे छापे पडण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

‘सरकारनामा’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी हे छापे असल्याचे त्यांनी सांगितले. या छाप्यांमागे राज्यातील कोणी नेता आहे का, या प्रश्नावर पटोले म्हणाले, की भाजपचे तसे सगळेच नेते अशा कारवायांत गुंतले आहेत. पण पहाटेला शपथ घेणारा नेता सगळ्यांनाच ठावूक आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांचे मंत्रिमंडळ झाले. त्यांचे ८० तासांचे सरकार हा महाराष्ट्रासाठी एक इतिहासच ठरला. आता तर त्यांना दिवसादेखील सत्तेची स्वप्ने पडत आहेत. तेच या कारवायांच्या मागे आहेत, अशा शब्दांत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

सोमय्यांकडून राज्याचे मनोरंजन

किरीट सोमय्यांना आरोप करण्यासाठी भाजपने सुसाट सोडले आहे. ते काय बोलतात, कुठले पुरावे दाखवतात, हे गौडबंगालच आहे. ते राज्याचे मनोरंजन करण्याचे काम करतात. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही आरोप केले होते. त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. मात्र न्यायालयानेच त्यांना निर्दोष सोडले. आता सोमय्या पुन्हा तसेच वागत आहेत असल्याचे पटोले म्हणाले.

आता चुका सुधारल्या

देगलूर येथील पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकाराचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार असल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. मात्र या निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ भाजपचाच होणार आहे, असा दावा करीत पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या. मात्र, आता त्या चुका आम्ही सुधारल्या आहेत. त्यामुळे दरेकर यांची आशा फोल ठरणार आहे.

पवार - ठाकरे भेटीतील चर्चा गुलदस्तात

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सातत्याने भेटत असल्याचे दिसून येतात. तुम्ही मात्र मुख्यमंत्र्यांना भेटत नाही, यावर ते म्हणाले की किमान समान कार्यक्रमामधून हे सरकार चालत आहे. सोबतच या महाविकास आघाडीमध्ये समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीमध्ये आमच्या पक्षाकडून वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आहेत. या दोघांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटण्याचे कारण नाही. मला संघटनेचीही कामे असतात. पण शरद पवार वारंवार मुख्यमंत्र्यांना का भेटतात, या भेटीत काय चर्चा होतात, हे आपल्याला माहीत नाही.

नितीन राऊत यांना सल्ला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यविषयी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. त्याबद्दल विचारले असता, इतिहासातील मुद्दे उपस्थित करण्याची ही वेळ नाही. आज महागाई, बेरोजगारी, शेतकरी व उद्योजक यांचे प्रश्न पुढे ठाकले आहेत. घटनात्मक व्यवस्थेला तुडवण्याचे काम भाजप करीत आहे. याबाबत लढण्याची गरज आहे. इतिहासातील मुद्दे उपस्थित करू नयेत, असा आपला सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. हा सल्ला राऊत यांच्यासाठीही आहे का, या प्रश्नावर त्यांनी हो, राऊत यांनीही असे करण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले.

मुलाखतीतील इतर प्रमुख मुद्दे

  • विधानसभा अध्यक्षपद निवडणूक हिवाळी अधिवेशनात घेण्याचा प्रयत्न

  • मी मंत्रिमंडळात नाही, हे माझे नशीबच आहे. मी संघटनेतच काम करणार

  • स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वबळावर लढण्याचा माझा आग्रह कायम

  • वाझे प्रकरणात सल्ला ऐकला असता तर सरकारवर बॅकफूटवर गेले नसते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com